अनुभव ते अनुभूती वैयक्तिकतेतून
वैश्विकतेकडे जाणारा लेखनप्रवास

केतकी गीतान्जलि

लेखिकेबद्दल

केतकी गीतान्जलि

|| केतकी गीतान्जलि ||

एक लेखिका म्हणून "मी कोण?", या प्रश्नाचं उत्तर मला त्या मानाने सहजसाध्य वाटतं. मी म्हणजे माणूसपणाचा एक अंश; वैयक्तिक ते वैश्विक असा प्रवास करत जाणारा एक बिंदू.. पायांना इच्छांचे मन फुटलेला.. दिसेल ते ऐकायला आसावलेला.. डोळ्यांत कुतुहल साठवलेला.. सर्वकाही जाणून घेणारा, कळलेल्याची आवर्तनं करणारा.. अनुभवातून अज्ञात दुवे सांधू बघणारा.. ओंजळभर असलेलं आभाळभर पेरत नेणारा.. आज पेक्षा उद्या समृद्ध होत जाणारा.. ह्या प्रवासात मुठीत मावणाऱ्या सावलीखाली पहुडून दूरवरची गीतं ऐकणारा, खूप मागचं आसुसून आठवू बघणारा.. आपली मुळं खणू इच्छिणारा..तांड्यातील प्रवाशांच्या कथा मनात साठवणारा.. सतत काहीतरी शोषत जात विश्वाचा नकाशा उलगडून त्यात स्वतःचा ध्रुवतारा शोधणारा !

अन मग एक दिवस असा उजाडतो की साठवलेला सगळा खजिना दुथडी भरून वाहायला लागतो. पाऊस वाऱ्यात अन नितळ सूर्यप्रकाशात एक इंद्रधनुष्य निर्माण होतं. समुद्रमंथनाच्या वरताण त्यातून अद्भुत चीजा प्रकटतात आणि नवरसांचे गंध ल्यालेल्या कथांचे तरंग त्यातून ठिबकतात. टपटप् वाजू लागतात.. हळुवारपणे निथळू लागतात. हा प्रवास जगत जाणं, त्यांची गीतं गात पुढे वाटचाल करणं.. तुडुंब भरत जाणं अन रितं होणं, म्हणजेच माझं लिहित जाणं!

विचारांची अभिव्यक्ती

आता मागे वळून बघितलं तर असं वाटतं की मला जन्मजात पंख मिळाले होते, कदाचित तसे ते सर्वांनाच मिळत असावेत. स्वतंत्र वृत्तीमुळे मला त्याची जाणीव लवकर झाली असावी, इतकंच. दृष्टीला पंख होते, वृत्तीला पंख होते. स्वतंत्रतेचे पंख होते, कल्पकतेचे पंख होते. ते पंख फुलपाखरी नव्हते. भ्रमरी नव्हते. बहुदा मधमाशीचे असावेत. मध गोळा करण्यासाठी एक छोटीशी पोटली होती पोटापाशी. तेवढंच होतं माझ्याकडे; एक छोटसं स्वतंत्र अस्तित्व आणि शिदोरी. मला कळलं, त्या चिमुकल्या पोटलीत मी जे साठवत जाईन, तोच माझा चेहरा अन् तीच माझी ओळख.

मग मी खूप फिरले, भटकले. उन्हात - पावसात - वाऱावादळांत. डोंगराअलीकडे - पलीकडे. मैदानात - ढगांवर..मन जाईल तिथे, पंख नेतील तिथे. शुभ निळ्या आभाळातून मातीत झिरपतांना बघत राहिले. विविध रंगाचे ढंगांचे सहप्रवासी भेटले. त्यांनाही कधी शब्दांनी, कधी रंगानी चितारत गेले. माझं घरटं रोज सुंदर सूर्य किरणांनी न्हात गेलं, तारांगणांत उजळत गेलं. अंधारात मावळून उजेडाची वाट बघत जागं होत गेलं.बस्, इतकंच.

|| केतकी गीतान्जलि ||

निवडक लेखन

स्टारसीड्स

चिरंजीव सप्तर्षींचे वारस, “सत्यम् शिवम् सुंदरम्” या तत्वाशी निष्ठावान. जगाच्या अंतापर्यंत हातात हात घालून अखंड प्रवास करणारे. वादळात दीपगृहासारखे, आकाशात ध्रुवताऱ्यासारखे मार्गदर्शक. अत्यंत गरजेच्या क्षणी धावून येणारे आणि नकळत पुन्हा अदृश्य होणारे. मुठभर चांगुलपणा मणभर वाईटपणावर मात करू शकतो, हे आपल्या कृतीतून ठामपणे दाखवणारे. आपल्यातलेच, आपल्यासारखेच—हेच खरे स्टारसीड्स, जे आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

ती.. अंशतः
ती ...(अंशतः ....)

स्त्रीच्या बाह्य रूपापलीकडे जाऊन तिच्या सखोल भावना, संवेदनशीलता आणि अथांग अंतर्मनाचा वेध हे पुस्तक घेते. पुरुषप्रधान व्यवस्थेला तिचे हे असीम, चैतन्यमय रूप खऱ्या अर्थाने समजून घेण्याचे यात सखोल आवाहन आहे.

आत्ताच तुमची प्रत मागवा
अन्तर्यात्रा
अन्तर्यात्रा

प्रवास ते यात्रा. मांदियाळी ते सार्थ. "मी कुणीतरी आहे." ही उपजत असलेली जाणीव. "मला काहीतरी हवं आहे." हा शोध. मला जे हवं आहे त्याचा ध्यानीमनी असलेला ध्यास. त्याचा पाठपुरावा आणि ओंजळीतले स्वानुभव. "कोऽहम्?" ते "सोऽहम्" ही स्वतःभोवती घातलेली प्रदक्षिणा. एक परिक्रमा. नित्य नूतन तितकीच प्राचीन. एक अन्तर्यात्रा वैश्विक होत गेलेली. विश्वास वाढवते.

शतरूपा
शतरूपा

स्त्रीच्या विविध रूपांचे, तिच्यातील अखंड वात्सल्याचे आणि सकारात्मकतेचे हे सुंदर दर्शन आहे. छोट्या गोष्टींतील आनंद शोधत, स्वतःवर प्रेम करत स्वतःमधील ईश्वरी अंशाची ओळख घडवणारे हे एक अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे.

आत्ताच तुमची प्रत मागवा
मुक्तछंद
मुक्तछंद

मन मोकळे करून निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदपणे कसे जगावे, याचे विलोभनीय वर्णन यात आहे. लहान मूल होऊन फुलपाखरे, प्राणी आणि निसर्गातील छोट्या गोष्टी अनुभवत वर्तमानात जगण्याचा निखळ आनंद यात मांडला आहे.

आत्ताच तुमची प्रत मागवा
सकल बन
सकलबन

मानवी मनाच्या चंचल, हळव्या आणि दिलासादायक रूपांचे यात संवेदनशील वर्णन आहे. कधी निरागस बालक तर कधी चिमण्यांची शाळा बनणारे हे मन, अंधाराशी झुंजत पहाटेपर्यंत लेखिकेला एकांतात शांत साथ देते.

शाम रंग रंगा रे
शाम रंग रंगा रे

या पुस्तकात सभोवतालच्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेल्या प्रेमकथा उलगडल्या आहेत. कोणत्याही चौकटीत न बसणाऱ्या, खऱ्या जिवांनी निखळ मनाने केलेल्या वैश्विक प्रेमाच्या आणि शाश्वत नात्यांच्या या अत्यंत तरल आणि हृदयस्पर्शी कहाण्या आहेत.

आत्ताच तुमची प्रत मागवा
ताम्रलिपी
ताम्रलिपी

या पुस्तकात निसर्ग, प्राचीन कला, इतिहास आणि मानवी मनाच्या अथांग भावनांचे गूढ व काव्यमय वर्णन आहे. चिनारचे वृक्ष, वेरूळचे शिवमंदिर आणि समुद्राच्या लाटांमधून उलगडणाऱ्या अद्भुत कथांचा हा खजिना आहे.

आत्ताच तुमची प्रत मागवा
मृदगंध
मृद्गंध

लेखिकेने संपूर्ण भारतभ्रमणातून टिपलेले मानवी आणि नैसर्गिक अनुभव यात गुंफले आहेत. वयापेक्षा अधिक समृद्ध जीवन जगताना साठवलेल्या आठवणी, लोकांचे हास्य आणि निसर्गाचे बारकावे यांचे हे मनमोहक शब्दांकन आहे.

आत्ताच तुमची प्रत मागवा
बिब्बा
बिब्बा

हे पुस्तक निसर्गालाच सर्वोच्च मानणाऱ्या, साधेपणात आनंद शोधणाऱ्या आणि माणुसकीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनांसाठी आहे. हे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करून स्वतःचा शोध घेण्यास आणि आंतरिक समृद्धीचा अनुभव देते.

आत्ताच तुमची प्रत मागवा
ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना
ऋग्वेद

भारताचा उज्ज्वल इतिहास आणि समृद्ध वैदिक वारसा तरुण पिढीला शिकवण्याचे महत्त्व यात मांडले आहे. आक्रमणांऐवजी पूर्वजांची संपन्नता आणि ज्ञान सांगितल्यास मुलांमध्ये आत्मसन्मान जागृत होऊन हा चिरंतन वारसा खऱ्या अर्थाने पुढे जाईल.

आत्ताच तुमची प्रत मागवा
ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना
नाद अनवट

आयुष्याच्या वाटेवर स्वतःचा आणि जगाचा शोध घेणाऱ्या दोन अनाम प्रवाशांचे हे अविरत आत्ममंथन आहे. हा प्रवास माणसाला अधिक मुक्त, पारदर्शक आणि प्रगल्भ बनवत ईश्वरी कलाकृती असल्याची सखोल जाणीव करून देतो.

आत्ताच तुमची प्रत मागवा
ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना
शान्तियात्रा

निरन्तरपणे चालणारी ती अन्तर्यात्रा. चिरंजीवत्व लाभलेली. बहुरूपी - बहुरंगी - बहुढंगी - बहुगुणी. आपल्याच आवाजाची स्पंदनं आपल्यापाशी परतवून आणणारी. आपल्याला हवी ती प्रतिबिंबं आपल्याच मन:पटलावर उमटवणारी. त्यातलीच एक वाट शान्तियात्रेकडे नेणारी. आपल्यातच असणारा आनंद, शांती, कृतज्ञतेचा सुगंध आपल्याकडे ओंजळ भरून आणणारी ती शान्तियात्रा. जाणीव करून देतो.

भय इथले.. The Eternal Legacy of The Dark
भय इथले..

जागतिक महासत्ता असणारे देश. पैशाच्या जोरावर जगात मुजोरी करणारे. अधिकार गाजवणारे. कणगीतून ओतलेल्या साखरेमागे जाणाऱ्या मुंगळ्यांप्रमाणे ह्यांच्यामागे आपसांत स्पर्धा करत जाणारी माणसं. आधुनिक जगात "पैसा" हे माणूस मोजण्याचे एकमेव माप मानणारी. ह्यांच्या अवाढव्य धनराशींच्या सडलेल्या ढिगाऱ्याखाली किती मानवी मनं, शरीरं, सुपीक जमिनी, संस्कृती निघॄणपणे नष्ट पावल्या, याची अधून मधून उजळणी करणं गरजेचं आहे. "भय इथले.." ही कादंबरी ही अशीच एक उजळणी. माणसातील मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाीव करून देतो.

संपर्क साधा

शब्दांतून उमलणारं जग

शाश्वत विचार

प्राचीन भारतीय चिंतनाची अनुभूती

संवेदना

निसर्ग, मन आणि जीवनाचा स्पर्श

अनुभूती

जगण्यातून उमलणारं अंतर्मन

चिंतन

स्वतःचा ध्रुवतारा शोधण्याचा प्रवास